शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथरचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:37 IST

डीएमई हे कृत्रिम (सिंथेटिक) इंधन असून पारंपरिक इंधनांच्या तुलनेत अनेक फायदे देते.

औंध : घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथर हा पर्यायी गॅस शोधण्यास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी स्वच्छ ज्वलनक्षम इंधन ऊर्जा सुरक्षितता आज अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची गरज बनली आहे.

भारतातील ८० टक्क्यांहून अधिक जीवाश्म इंधनाची गरज आयातीवर अवलंबून आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध भू-राजकीय अडथळ्यांमुळे या ऊर्जा पुरवठ्यावर धोका निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालेल्या एलपीजीच्या किमतीत अलीकडील पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून स्वदेशी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक इंधनाचा शोध अत्यावश्यक ठरला आहे. डायमिथाइल इथर (डीएमई) हे असेच एक आशादायी इंधन असून ते स्वच्छ ज्वलनक्षम आहे आणि स्वयंपाक तसेच इतर क्षेत्रांत क्रांती घडवण्याची क्षमता त्यात आहे. स्वच्छ ज्वलन आणि बहुउपयोगिता 

डीएमई हे कृत्रिम (सिंथेटिक) इंधन असून पारंपरिक इंधनांच्या तुलनेत अनेक फायदे देते. हे ज्वलनाच्या वेळी अत्यल्प नायट्रोजन प्रमाणात काजळी, ऑक्साइड्स, सल्फर ऑक्साइड्स आणि सूक्ष्मकण उत्सर्जित करते. तसेच याची उष्णताक्षमता पारंपरिक इंधनांच्या तोडीस तोड असल्यामुळे ते प्रभावी पर्याय ठरू शकते.

डीएमईचे एलपीजीमध्ये विविध प्रमाणात मिश्रण करता येते, ज्यामुळे भारताची एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. भारतीय मानक ब्युरोने आयएस १८६९८:२०२४ या मानकाद्वारे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रणास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिसळण्यासाठी सिलिंडर, गॅस्केट, रेग्युलेटर, होज किंवा बर्नरमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.  

English
हिंदी सारांश
Web Title : Dimethyl Ether: A Promising Alternative to LPG for Home Use

Web Summary : Scientists have found dimethyl ether (DME) as an alternative to LPG. DME is a clean-burning, domestically producible, and sustainable fuel that can reduce India's reliance on LPG imports. Up to 20% DME can be mixed with LPG, potentially revolutionizing cooking and other sectors.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Hikeइंधन दरवाढ