शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

बारामती तालुक्यात कमी वजनाची बालके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 1:22 AM

बारामती तालुक्यात तीव्र कमी वजनाची ७२ बालके आढळली आहेत. तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वांत जास्त तीव्र कमी वजनाची १५ बालके आढळली आहेत. बालग्राम विकास योजनेतून पुढील दोन महिने या बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येणार आहे.

बारामती - बारामती तालुक्यात तीव्र कमी वजनाची ७२ बालके आढळली आहेत. तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वांत जास्त तीव्र कमी वजनाची १५ बालके आढळली आहेत. बालग्राम विकास योजनेतून पुढील दोन महिने या बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येणार आहे. त्याद्वारे या बालकांना सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी दिली.जिल्ह्यात सर्वप्रथम बारामती तालुक्यामध्ये महिला व बालकल्याण विभागांतर्गत बालग्राम विकास योजनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. जिल्ह्यात कुपोषणाच्या बाबतीत बारामती तालुक्याचा दुसरा क्रमांक लागल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे बारामती पंचायत समितीचा बालकल्याण विभाग तीव्र कुपोषीत बालकांना सदृढ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. बारामती तालुक्यात अंगणवाडीतील कमी वजनाच्या बालकांसाठी आता अतिरिक्त आहारसंहिता व औषधसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून बारामती तालुक्यातील कमी वजनाच्या बालकांसाठी ६० दिवस अतिरिक्त आहार दिला जाणार आहे. बारामती तालुक्यातील ४१६ अंगणवाड्यांत महिनाभरापूर्वी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांनी केलेल्या सर्वेक्षणात उंचीनुसार तीव्र कमी वजनाची व बुटकी बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. बारामती तालुक्यात प्रकल्प एकच्या विभागात ५० कमी वजनाची बालके आहेत. प्रकल्प दोनमध्ये २२ बालके अशी एकूण ७२ तीव्र कमी वजनाची बालके आढळून आली आहेत.अंगणवाडीत देणार अतिरिक्त आहारकमी वजनाच्या बालकांना आहार देण्याच्या अगोदर त्यांचे वजन तपासून नोंद ठेवली जाणार आहे. बारामती तालुक्यात ५० ठिकाणी ६० दिवस अंगणवाडीतच सकाळी आठपासून संध्याकाळी सहापर्यंत दर दोन तासाला वेगवेगळ्या पद्धतीने अतिरिक्त आहार देऊन कमी वजनाच्या बालकांना जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून लोहवर्धक, कॅल्शियमयुक्त औषधे, प्रोटिन कार्बोहायड्रेड असलेले पदार्थ असे वजनवाढीसाठी दिली जाणार आहेत. त्याचबरोबर आहारात पिठाची लापशी, रवा, उपमा, खीर, शेंगदाणे, खोबऱ्याचा किस, उकडलेले बटाटे, अंडी, फळे, गुळ, शेंगदाणे, खजूर, राजगीरा लाडू, अंगणवाडीतील दोन वेळेतील आहार व घरचा आहार अशा पद्धतीने दिवसभरात बालकांना अतिरिक्त आहार दिला जाऊन या बालकांना सदृढ करण्यात येणार आहे.बारामती तालुक्यातील ४१६ पैकी २३६ अंगणवाड्यांमध्ये परसबागा फुलणार आहेत. या परसबागांमध्ये शेवग्याची शेंग, कढीपत्ता, बीट, टोमॅटो, बटाटा, मेथी, केळी, ढोबळी मिरची, काकडी, पालक आदी सकस फळभाज्यांचे उत्पादन घेऊन त्यांचा वापर बालकांच्या आहारामध्ये करण्यात येणार आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीHealthआरोग्य