शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

‘कमी कर्ब उत्सर्जन’ हेच आता विकासाचे मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:29 IST

सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे

ठळक मुद्दे ‘शून्य कर्बभार पुणे २०३०’ अहवाल पुणे आणि परिसराचा विकास करताना ‘कार्बन न्यूट्रल डेव्हलपमेंट’ सक्तीने करावे लागणार पुण्यात ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ स्मार्ट सिटीसाठी तयार

पुणे : येत्या २०३० पर्यंत पुण्याला शून्य कर्बभार (कार्बन न्यूट्रल) बनवायचे असेल, तर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे हाच एक उपाय आहे. त्यासाठी विकास करताना कमी कर्ब उत्सर्जन होईल, असे मॉडेल बनविणे, ग्रीन टाऊनशिप तयार करणे, लोकसंख्येवर नियंत्रण आणणे, ऊर्जा, पाणी, कचरा, वाहतूक या विषयांवर योग्य उपाय करणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांवर एकत्रित काम केल्यास शून्य कर्बभार शक्य होणार आहे. पुणे आणि परिसराचा विकास करताना ‘कार्बन न्यूट्रल डेव्हलपमेंट’ सक्तीने करावे लागणार आहे. त्यातूनच देशासाठी पुणे शून्य कर्बभार रोल मॉडेल होऊ शकेल.   पुण्यात ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ स्मार्ट सिटीसाठी तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली तर खूप फायदा होऊ शकतो. नागरिकांनी कार्बन फूटप्रिंट (कर्ब पदचिन्हे) कमी करण्याचा ‘कूल कल्चर’ अंगिकारला तर तो अर्बन एरियासाठी दिशादर्शक ठरणारे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक कामे होऊ शकतात. त्यामुळे वाहन बाहेर काढून होणारे कर्ब उत्सर्जन कमी होऊ शकते. त्यासाठी व्हीडिओ  कॉन्फरन्सिंग, आॅनलाइन इनर्ट अ‍ॅक्शन्सचा वापर केल्यास कार्बन फूटप्रिंट कमी होईल.  नवीन इमारतींमध्ये ई-व्हेईकल चार्जिंग करण्याची सुविधा दिल्यास इंधन जाळणारी वाहने कमी होतील. कृत्रिम कार्बन शोषून घेणारी झाडांची रचना टाऊनशिपमध्ये उभारता येईल, असे ‘पुणे शून्य कर्बभार २०३०’ या अहवालात नमूद आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे डॉ. अमिताव मलिक, अदिती काळे यांच्यासोबतच अनेक संस्थांनी एकत्र येत हा अहवाल तयार केला आहे. ...............शहरात अधिक कार्बन उत्सर्जन होत आहे. पण त्याचा फटका मात्र ग्रामीण भागातील लोकांना बसत आहे. कारण हवामानावर परिणाम झाला की, शेतकºयांना त्यात भरडावे लागते. जमिनीतील खनिज आपण खूप वापरतोय. खरंतर हवामानबदलावर उपाय करणारे दीर्घकालीन धोरण करायला हवे. हवेतील कार्बन कमी करून खनिजांचा वापरही कमी केला पाहिजे. सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. - प्रियदर्शनी कर्वे, समुचित लया समूह ...........काय केले पाहिजे ? पर्यावरणीय कायदा पाळणे आवश्यक असून, बीडीपीमधील अतिक्रमण आणि प्रदूषण कमी करायला हवे. वृक्षतोड न करता ग्रीन कव्हर वाढविले पाहिजे. देशी झाडांवर भर हवा. पाणथळ, नदी, तलावांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याची सूचना अहवालात आहेत. .........सायकलचा वापर करा... सायकल शेअरिंग योजना हा कर्ब उत्सर्जन कमी करण्याचा अत्यंत चांगला उपक्रम आहे. सायकल कुठेही मिळतात आणि कुठेही ठेवता येतात. तसेच ई-रिक्षा हा इको-फ्रेंडली पर्याय आहे. एलपीजी, डिझेलवर त्या उपलब्ध आहेत. .......पुण्यात वाहनांमधून होणारे कर्ब उत्सर्जन  वाहन प्रकार         संख्या                 कर्ब उत्सर्जन कार                  ५,३७,६१३                 २२ टक्के दुचाकी              १७,५०,१७१              २१ टक्के ट्रक, लॉरी          ३३,४०८                  १९ टक्के स्कूटर              ५,२३,६९८                 ८ टक्के डिलिव्हरी व्हॅन    ४२,४६७                ७ टक्के मोपेड                १,९५,६९१               ३ टक्के कॅब्स                    २१,१५८              ३ टक्के डिलिव्हरी व्हॅन    ३१,९२०               ३ टक्के (तीनचाकी)..............

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणfour wheelerफोर व्हीलरtwo wheelerटू व्हीलर