शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 06:19 IST

रुग्णालयातील प्रसूती विभागात गर्भवतींचे होणारे हाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार यावरून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागात गर्भवतींचे होणारे हाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार याचा ‘लोकमत’ने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. प्रशासनाने याची दखल घेऊन रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आता डॉ. स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्रसूती विभागात जेमतेम २५ बेड उपलब्ध असून, तेथे ३२ महिला प्रसूतीकरिता दाखल असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली. मागील दोन महिन्यांत रुग्णालयाने ७८ महिलांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात धाडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. येथे नूतनीकरण करताना ऑक्सिजन लाइन टाकण्याची निविदाच काढली नसल्याचे उघड झाले. या वृत्त मालिकेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी आयुक्तांकडे खुलासा मागवला. महिलांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागासह कळवा रुग्णालय प्रशासनाची बैठक घेऊन येथील बेड वाढविण्याचे निश्चित केले. तसेच कामात हलगर्जी करणारे रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. माळगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डॉ. बारोट यांच्याकडील रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्यांच्या जागी आता डॉ. कदम यांची नियुक्ती केली. कदम शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख आहेत. डॉ. माळगावकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dean Dr. Barot Removed; Negligence Blamed, Notice to Medical Officer

Web Summary : Following Lokmat's reports on poor conditions at Shivaji Hospital's maternity ward, Dean Dr. Barot was removed and Dr. Kadam appointed. A notice was issued to Dr. Malgaonkar for negligence. The administration acted after media coverage and government intervention to improve patient facilities.
टॅग्स :thaneठाणेdoctorडॉक्टर