शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 00:16 IST

शेतकऱ्यांनी निर्णय होईपर्यंत ऊस तोडी घेऊ नयेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

राज्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज कोल्हापूरात ऊस दरा संदर्भात पहिली बैठक झाली. ही पहिली बैठक निष्फळ ठरली.पहिल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांची भूमिका मान्य नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखाना चालू होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. 

दालमिया कारखान्याची एफआरपी 3642 रुपये असताना त्यांनी केवळ 3525 रुपये जाहीर केले.  हे सर्व बेकायदेशीर आणि नियमबाह्य आहे. कारखानदारांनी कायदा धाब्यावर बसवून हे असे करत आहेत.  हे बेकायदेशीररित्या चालू असणारे कारखाने आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू, प्रशासनाने आमच्या मध्ये येऊ नये, असा इशारा शेट्टी यांनी दिला.  आमच्यावर संघटितरित्या साखर कारखान्यांनी अन्याय केलेला आहे.  काही कारखान्यांनी तर एफआरपी निघत असतानाही पहिली उचल कमी देऊन अन्याय केला आहे.  मुख्यमंत्री परवा जिल्ह्यात येत आहेत; त्यांनी ठोस निर्णय न घेतल्यास, त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही. जोपर्यंत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा खुलासा होत नाही, तोपर्यंत ऊस तोडी सुरू होऊ देणार नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले.

 राजू शेट्टी म्हणाले, जोपर्यंत 3600 रुपये ते 3700 रुपये ची रक्कम हिशोब करून मिळत नाही, तोपर्यंत ते कारखाने सुरू होऊ देणार नाहीत. जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपी जास्त बसत असतानाही पहिली उचल कमी देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे.  बिद्री कारखान्याची एफआरपी 3552 रुपये असताना त्यांनी 3400 रुपये दिले.  भोगावती कारखान्याची एफआरपी 3600 रुपये असताना त्यांनी 3400 रुपये जाहीर केले. दालमिया कारखान्याची एफआरपी 3642 रुपये असताना त्यांनी केवळ 3525 रुपये जाहीर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sugarcane Price Talks Fail; Raju Shetti Threatens Factory Closures

Web Summary : Sugarcane price talks in Kolhapur failed, leading to threats of factory closures by Raju Shetti. Dissatisfied farmers are alleging FRP violations and demanding fair prices, warning of protests if demands aren't met. He warns the CM will be questioned if issues are not resolved.
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी