इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:50 IST2025-01-21T10:50:26+5:302025-01-21T10:50:53+5:30

आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले, त्यानंतर फोटो काढून मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले

Love through acquaintance on Instagram; 18-year-old girl sexually assaulted by boyfriend and friend | इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार

इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार

किरण शिंदे 

पुणे : त्या दोघांची ओळख तू सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर झाली. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. याचे त्याने फोटो व्हिडिओ काढले. आणि नंतर हेच फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीला मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. १८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १७ वर्षे सहा महिन्याची असताना तिची ओळख एका आरोपी सोबत इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघे भेटत राहिले. त्यावर आरोपीने तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरोधात शरीर संबंध ठेवले. याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर हेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी आणि त्याच्या मित्राने पीडित तरुणी सोबत शरीर संबंध ठेवले. दरम्यान त्यानंतर ही दोघे वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करत होते. शेवटी पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पर्वती पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता ६४(१), ७०(१) सह पॉक्सो ४,८,६,१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे करीत आहेत.

Web Title: Love through acquaintance on Instagram; 18-year-old girl sexually assaulted by boyfriend and friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.