प्रेम, लग्नाचे आमिष अन् फसवणूक; पुणे महापालिकेत नोकरी लागताच दुसरीशी लग्न ठरवलं, तक्रारीनंतर आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:51 IST2026-03-25T15:51:32+5:302026-03-25T15:51:54+5:30

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणारा गजाआड; आरोपीला महापालिकेत नोकरी लागल्याने ठरवले दुसरीशी लग्न 

Love, marriage lure and fraud; As soon as he got a job in Pune Municipal Corporation, he decided to marry someone else, accused arrested after complaint | प्रेम, लग्नाचे आमिष अन् फसवणूक; पुणे महापालिकेत नोकरी लागताच दुसरीशी लग्न ठरवलं, तक्रारीनंतर आरोपी अटकेत

प्रेम, लग्नाचे आमिष अन् फसवणूक; पुणे महापालिकेत नोकरी लागताच दुसरीशी लग्न ठरवलं, तक्रारीनंतर आरोपी अटकेत

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सहा वर्षांनी महापालिकेत नोकरी लागल्याने दुसऱ्या मुलीशीलग्न ठरवले. ही बाब पीडितेला समजताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरून चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीसह बलात्कार व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. प्रथमेश सुनील देशमुख (वय २९, रा. सुधा रेसिडेन्सी, पिंपळे निलख) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय पीडितेची आणि आरोपी प्रथमेश देशमुख याची ओळख २०१८ मध्ये सोशल मीडियावर झाली.एकाच शहरात राहत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्यास सुरूवात केली. भेटीदरम्यान आरोपी प्रथमेश याने पीडितेला आपणलग्न करू म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवत प्रथमेशने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले.२०२२ मध्ये दोघांच्या घरच्यांनी एकत्र येत टिळ्याचा कार्यक्रम देखील केला. त्यानंतर आरोपीचा मामा परीमल भणगे (रा. औंध) याने मोठे लग्नकरण्याच्या कारणावरून लग्न मोडले. त्यानंतरही प्रथमेशने पीडितेला एका मंदिरात घेऊन जात लग्न केले, तसेच घरच्यांचा होकार येईपर्यंतआपण वेगवेगळे राहू असे सांगत पुन्हा शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर २०२५ मध्ये आरोपी प्रथमेश देशमुख याला पुणे महापालिकेत नोकरी लागली. त्यामुळे त्याने पीडितेला तुला माझ्या घरी यायचेअसेल तर मोठे लग्न करून द्यावे लागेल असे सांगितले. 

यावर पीडितेने त्याला देखील होकार दिलेला असताना आरोपी प्रथमेशचे दुसऱ्याचमुलीशी लग्न ठरल्याचे पीडितेला १९ मार्च रोजी समजले. यानंतर पीडितेने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात जात आरोपी प्रथमेश देशमुख याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहल पाटील या करत आहेत.

Web Title : प्यार, शादी का झांसा, धोखाधड़ी: नौकरी लगते ही दूसरी से शादी, आरोपी गिरफ्तार

Web Summary : पुणे में एक व्यक्ति को शादी का वादा करके एक महिला को धोखा देने, शारीरिक संबंध बनाने और फिर नौकरी मिलने के बाद दूसरी से शादी करने की योजना बनाने के आरोप में गिरफ्तार किया गया। पीड़िता ने उसकी शादी के बारे में पता चलने पर पुलिस में शिकायत दर्ज कराई।

Web Title : Love, marriage lure, fraud: Pune man arrested after job deceit.

Web Summary : Pune man arrested for allegedly cheating a woman with marriage promises, having physical relations, then planning to marry another after securing a job. The victim filed a police complaint after learning about his upcoming wedding.