शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident: खड्डे चुकवताना ताबा सुटला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी, कल्याण–आहिल्यानगर राज्य मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:52 IST

Pune Otur Accident: या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यापूर्वीही येथे अनेक अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे

ओतूर (जुन्नर): कल्याण–आहिल्यानगर राज्य मार्गावर ओतूर येथील कोळमाथा–नंदलाल लॉन्स परिसरात मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्याच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  या अपघातात वरद अमोल तांबे (वय २०) रा.ओतूर ता. जुन्नर ( पुणे) व करण पवळे (वय २८) रा. पिरंगुट, पुणे) यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, चार तरुण कारमधून कल्याणच्या दिशेने प्रवास करत होते. ओतूर येथील कोळमाथा नजीक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने ते चुकवण्याचा प्रयत्न करत असताना वाहनचालकाचा ताबा सुटला. यावेळी कार प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या कवठाच्या झाडावर जोरात आदळली. त्यानंतर पुढे असलेल्या कठड्याला धडक देत पलटी झाली.       अपघात इतका भीषण होता की कारचे अक्षरशः मोठे नुकसान झाले. वाहनातील चारही तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व ओतूर पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात हलवले. त्यापैकी एकाला ओतूर येथील तर दुसऱ्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित दोघांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असता वरद तांबे व करण पवळे यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर ओतूर परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी व वाहनचालकांनी या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. कोळमाथा–नंदलाल लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यापूर्वीही येथे अनेक अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले.       संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मानवाधिकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत पा. डुंबरे यांनी दिला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pot-hole Swerving Leads to Fatal Crash: Two Dead, Two Injured

Web Summary : Two young men died and two were seriously injured near Otur on the Kalyan-Ahilyanagar highway after a car accident. The driver lost control while trying to avoid potholes, causing the car to crash into a tree and a barrier. Locals are demanding immediate road repairs.
टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरhighwayमहामार्गDeathमृत्यूcarकारroad safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलAccidentअपघात