शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव नरेंद्र चपळगावकर अन् प्रेमा पुरव यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:56 IST

'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा मानाचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना वैचारिक लेखनासाठी तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना जाहीर झाला

पुणे : 'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा मानाचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना वैचारिक लेखनासाठी तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना सोमवारी जाहीर झाला. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साधना ट्रस्ट आणि मासूम संस्थेच्या वतीने महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची घोषणा विनोद शिरसाठ, रमेश अवस्थी आणि सुनीती सु. र. यांनी पत्रकार परिषदेत केली. बाबा राम रहीम याच्या विरोधात प्रखर लढा दिलेले सामाजिक कार्यकर्ते अंशुल छत्रपती (हरियाणा) यांना ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ आणि अक्षरनामा वेबपोर्टलचे संपादक राम जगताप यांना ‘डिजिटल पत्रकारिता विशेष पुरस्कार’ देण्यात येणार आहे. पर्यावरण विषयकवाङ्मय पुरस्काराने संतोष शिंत्रे यांना गौरविण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

रमेश अंधारे यांच्या दगडी मक्ता या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार, मुक्ता बाम यांना रा. शं. दातार नाट्य पुरस्कार, डॉ. सिसिलिया कार्व्होलो यांच्या टिपंवणी या साहित्यकृतीला अ-पारंपारिक-वैचारिक ग्रंथ पुरस्कार, सुरेश सावंत यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार, सुनीता भोसले यांना कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार देण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपाचा युवा पुरस्कार युवराज गटकळ यांना देण्यात येणार आहे.

गतवर्षी पुरस्कार जाहीर झाले; पण वितरण होऊ शकले नाही. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊन परिस्थिती सामान्य राहिली तर मार्च महिन्यात पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकartकला