शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

स्वत:च्याच अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम पित्याला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 23:34 IST

आरोपी हा मोटारचालक म्हणून काम करतो. तो आपली पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीसह पिंपळे गुरव येथे राहत होता.

पुणे : आपल्याच अडीच वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पित्याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी जन्मठेप व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी हा मोटारचालक म्हणून काम करतो. तो आपली पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीसह पिंपळे गुरव येथे राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी आरोपी दारु पिऊन आला व आपल्या मुलीला तु अंगणवाडी शाळेला का गेली नाही, असे विचारुन मारहाण करु लागला. फिर्यादीने त्याला अडविल्यावर तिलाही मारहाण केली. फिर्यादी या स्वच्छतागृहात गेल्या असताना मुलगी रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर पती मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता. त्याने दोघींना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी त्याने अशाच प्रकारे मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.

या खटल्यात विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी ७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणLife Imprisonmentजन्मठेप