Pune Police: पुढील ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास लायसन्स रद्द; पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:42 IST2026-02-26T16:41:10+5:302026-02-26T16:42:45+5:30

दि. २६ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील ३० दिवसांसाठी एक विशेष चलन भरणा मोहिम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

License will be cancelled if fine is not paid within 30 days; Pune Traffic Police decision | Pune Police: पुढील ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास लायसन्स रद्द; पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

Pune Police: पुढील ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास लायसन्स रद्द; पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

पुणे: पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनीकारवाईचा बडगा उगारला आहे. जे नागरिक वाहतुकीच्या दंडाचे चलन पुढील ३० दिवसाच्या आत भरणार नाहीत. अशा वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला आहे. पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे हिम्मत जाधव यांनी एक्सच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे.   

दि. २६ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील ३० दिवसांसाठी एक विशेष चलन भरणा मोहिम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान नागरिकांना आपल्या नंबरवर MHPECH-G या अधिकृत शॉर्टकोडद्वारे येणाऱ्या एसएमएस अनुसार आपल्या वाहनांवरील दंड भरावा ही विनंती जाधव यांनी केली आहे. 

पुण्यात अनेक चालक नियम मोडून वाहन चालवताना दिसून येत आहेत. त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनावर दंड आकारले जात आहेत. तसेच पोलीस तपासणीतही अनेक वाहनांवर ऑनलाईन दंड आकारले जात आहेत. ते दंड वेळेत वाहनचालक भरत नाहीत. आता यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी नागरिकांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत संपण्याच्या आत दंड न भरल्यास थेट लायसन्स रद्द करणार असल्याचे सांगितले आहे.  

Web Title : पुणे पुलिस: 30 दिनों में जुर्माना न भरने पर लाइसेंस रद्द

Web Summary : पुणे ट्रैफिक पुलिस ने चेतावनी दी है कि 30 दिनों के भीतर ट्रैफिक जुर्माना नहीं भरने पर लाइसेंस रद्द कर दिए जाएंगे। एक विशेष भुगतान अभियान आयोजित किया गया है, जिसमें नागरिकों से एसएमएस के माध्यम से जुर्माना भरने का आग्रह किया गया है।

Web Title : Pune Police: License Cancellation for Unpaid Traffic Fines in 30 Days

Web Summary : Pune traffic police warn that licenses will be revoked if traffic fines are not paid within 30 days. A special payment drive is organized, urging citizens to pay fines via SMS.