शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना रोगमुक्त करू या!

By admin | Updated: April 10, 2015 05:32 IST

महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आजपासून (१0 एप्रिल) जनावरांसाठी लाळखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाणार असून,

पुणे : महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आजपासून (१0 एप्रिल) जनावरांसाठी लाळखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, ८ लाख २३ हजार डोस दिले जाणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धनच्या सभापती अ‍ॅड. सारिका इंगळे यांनी दिली. १० एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ही मोहीम असून, आतापर्यंत ८ वर्षांत १९ वेळा हे लसीकरण करण्यात आले आहे. वर्षातून दोन वेळा १ रुपया सेवाशल्क घेऊन हे लसीकरण केले जाते. जिल्हा परिषदेचे २२७ व राज्य शासनाचे ९९ असे जिल्ह्यात ३३६ दावाखाने असून, ८ लाख २३ हजार डोसचा पुरवठा येथे करण्यात आला आहे. लाळखुरकत रोगामुळे दूध उत्पादनात घट होते. वंधत्व येते, कायमस्वरूपी धाप लागते व जनावर निकामी होते. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. यामुळे हे लसीकरण करणे गरजेचे आहे. सध्या उन्हाच्या झळा लागत असून, या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी हे लसीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्यके गावात, वाडी-वस्तीवर जाऊन डॉक्टर जनावरांना लसीकरण करणार आहेत. पशुपालकांना याचे महत्त्व पटावे, त्यांनी आपल्या जनावरांना हा डोस द्यावा, यासाठी डॉक्टर येण्याच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायतील पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. दवंडी देऊन लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)