शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 21, 2015 23:12 IST

काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पिंपळवंडी : काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी जिवाच्या आकांताने पळ काढल्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले. ही घटना बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे फस्त केली आहेत. तसेच माणसांवरही हल्ले झाले आहेत. येथील शेतकरी विलास कोंडिभाऊ वामन हे काळवाडी उंब्रज रस्त्याने विहिरीवरील मोटार बंद करून येत असताना या रस्त्याच्या उजव्या बाजूने जात होते. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या उसात दडून बसलेला बिबट्या वामन यांना दिसला. समोर बिबट्या दिसताच त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांनी मोठ्या धाडसाने आरडाओरडा करीत जिवाच्या आकांताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने हल्ला करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. ते पुढे आणि पाच ते सात फूट अंतरावर बिबट्या त्यांचा पाठलाग करीत होता. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी तेथील एका घराजवळ आश्रय घेतला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सावरले.यापूर्वीही बिबट्याने दोघांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षत्र असल्यामुळे बिबट्यांची अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज भागत आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तालुक्यातील बहुतेक गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात येतात. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवाची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. वनखात्याने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.बिबट्याची दहशत, दोन शेळ्यांचा फडशा४न्हावरे : नागरगाव (ता. शिरूर) परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ४नागरगाव येथे दोन दिवसांत बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. याचबरोबर, उसाच्या शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे येथील शेतकरी बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली शेतात काम करीत आहेत. ४दोन महिन्यांपूर्वीच येथील एक विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यांना चकवा देऊन विहिरीतून बिबट्याने धूम ठोकली होती. दरम्यान, त्या वेळी बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आणलेले पिंजरे अद्याप धूळ खात पडले आहेत. किमान ते पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी करूनदेखील त्याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचे उघड झाले आहे.