वारुळवारीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:47+5:302021-02-05T05:05:47+5:30

वारुळे मळ्यातील वारुळवाडी व गुंजाळवाडी शिवेवर २७ जानेवारीला शेतकरी व नागरिकांच्या मागणीमुळे वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. ...

Leopard caged in Warulwari | वारुळवारीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

वारुळवारीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

वारुळे मळ्यातील वारुळवाडी व गुंजाळवाडी शिवेवर २७ जानेवारीला शेतकरी व नागरिकांच्या मागणीमुळे वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्याला आमिष दाखविण्यासाठी पिंजऱ्यात ३ ते ४ कोंबड्या ठेवल्या होत्या. अखेर काल रात्री १० वा सुमारास बिबट्या सावजाच्या शोधात बिबट्या स्वत: सावज होत पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही माहिती शेतकरी संपत वारुळे यांनी वन अधिकारी मनीषा काळे यांना दिली. वनरक्षक रामेश्वर फुलवाड, सुधीर भुजबळ, खंडू भुजबळ, विश्वास शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा बिबट्या ३ वर्षाची मादी आढळून आली. जेरबंद झालेल्या मादी बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.

--

फोटो ओळी : ०१ नारायणगाव बिबट्या जेरबंद

फोटो ओळी : वारूळवाडी येथील वारुळे मळ्यात पिंजऱ्यात जेरबंद झालेली बिबट्या मादी

Web Title: Leopard caged in Warulwari