शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा हल्ला; दुचाकीचालक जखमी

By admin | Updated: January 31, 2015 00:22 IST

मांदारणे (ता. जुन्नर) येथे मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला ओतूर प्राथमिक

ओतूर/ उदापूर : मांदारणे (ता. जुन्नर) येथे मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ‘वायसीएम’ हॉस्पिटल पिंपरी, पुणे येथे पाठविण्यात आले आहे. अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान यांनी दिले. मांदारणे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब बबन महाकाळ (वय ४५ वर्षे) व त्यांची पत्नी सुरेखा बबन महाकाळ हे दोघे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उदापूर (ता. जुन्नर) या गावाकडून मांदारणे गावाकडे जात होते. तेव्हा मोटारसायकलचालक बाळासाहेब महाकाळ यांच्या मोटारसायकलवर झेप घेतली. तेव्हा महाकाळ यांच्या डोक्याला नखे लागून रक्तबंबाळ झाले. बिबट्याने हल्ला केल्याचे ओतूर येथील वनपाल एस. डी. वायभासे यांना तत्काळ लोकांनी कळविले. वनपाल एस. डी. वायभासे, उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बाळासाहेब महाकाळ यांना वाय.सी.एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविले. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. एक मादी व तिचे बछडे या परिसरात असावेत. रात्रीच्या वेळी मोटारसायकलचा आवाज व प्रकाश झोत यांमुळे बछड्यांना धोका वाटतो. म्हणून मादी अगर बिबट्या हल्ला करीत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इम्युनोग्लोबीन ही लस नसल्याने अशा प्रकारे जंगली प्राण्यांनी हल्ले केले, तर त्यांच्यावर उपचार करता येत नाही. ती लस उपलब्ध करून घ्यावी व उदापूर मांदारणे परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)