शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोशल नेटवर्कद्वारे विधानसभेची मोर्चेबांधणी

By admin | Updated: May 26, 2014 05:21 IST

काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. मोदी लाटेत गाजलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांच्या आशा उंचावल्या

पिंपरी : काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. मोदी लाटेत गाजलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांच्या आशा उंचावल्या असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवातही केली आहे. खडबडून जागे होत दादा, भाऊ, अप्पा, अण्णा, तार्इंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे तंत्र स्वीकारले असून, त्याद्वारे संदेशाचा मारा सुरू झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ ४ ते ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेऊन अनेक जण रिंगणात उतरण्याचा तयारीला लागले आहेत. इतका काळ कोठेच दिसत नसलेले अनेक इच्छुक जागे होत ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. विद्यमान आमदार मंडळीही नव्या दमाने मैदानात उतरली आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर तसेच व्हॉट्स अ‍ॅप आणि एसएमएसद्वारे नागरिकांशी संवाद वाढविला जात आहे. तसेच, संकेतस्थळावर स्वतंत्र पेज तयार केले आहे. त्यातून छायाचित्र व संदेश झळकत आहेत. विशेषत: खादीचा गणवेश परिधान केलेल्या आकर्षक भावमुद्रा पाहायला मिळत आहेत. महिला इच्छुकही मागे नसून मोहक रंगांतील साडीमध्ये त्या दिसत आहेत. केलेले काम, विविध प्रकारचे कार्यक्रम, सोहळे, ज्येष्ठ नेत्यांसोबतची छायाचित्रे पोस्ट केली जात आहेत. दररोज सकाळी सुविचार मांडून सर्वांना शुभ सकाळचा संदेश दिला जात आहे. यात खंड पडू दिला जात नाही. सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंतीला आवर्जून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशा कार्यक्रमास उपस्थित राहून त्याची छायाचित्रे व व्हिडीओ प्रसिद्ध केले जात आहेत. आपण प्रभावीपणे काम करत आहोत, हे दाखविण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र व्हॉट्स अ‍ॅपवरील गु्रपचे मॅनेजमेंट करण्यात गर्क आहेत. समर्थकांनी ग्रुप तयार करून संदेशाचा मारा सुरू केला आहे. तयारीला लागा... असा संदेश देत आहेत. (प्रतिनिधी)