शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरच्या कालव्यातून गळती

By admin | Updated: March 29, 2017 00:02 IST

नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन आठ दिवसांपासून चालू आहे़ मात्र कालव्याचे अस्तरीकरणाचे काम

नेरे : नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन आठ दिवसांपासून चालू आहे़ मात्र कालव्याचे अस्तरीकरणाचे काम रखडल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन लाखो लिटरची नासाडी होत आहे़तालुक्यातील पश्चिम, दक्षिण भागात वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे़ या भागातून दोन धरणांचे दोन कालवे गेलेले आहेत़ या कालव्याच्या पाण्यावर परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहे़ कालव्याची दोन आवर्तने वेळेत सोडल्याने पिके चांगली आली आहेत. एकीकडे वीसगाव खोऱ्यात शेतकरी धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी करीत आहेत़ दुसरीकडे नीरा-देवघर धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे़ मात्र नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती आसल्याने ठिकठिकाणी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ कालव्याच्या अतिगळतीमुळे कालव्याखालील शेती, पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ कालव्याच्या अस्तरीकरणाचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार व पाण्याची गळती कधी थांबणार? असा प्रश्न नागरिक, शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)कालव्याची कामे अपूर्ण आहेत, याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून २२ मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो, पाणीबचतीसाठी बऱ्याच काही उपाययोजना, घोषणा केल्या जातात़ मात्र, गळती व पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष होते. एकीकडे भोर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे कालव्याच्या गळतीने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़