शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासह अळ्या मोफत!

By admin | Updated: July 17, 2014 03:28 IST

निळुंज (ता. पुरंदर) येथे गावाला व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा होणाऱ्या शासकीय टँकरने दूषित पाणीपुरवठा होत असून, या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

खळद : निळुंज (ता. पुरंदर) येथे गावाला व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा होणाऱ्या शासकीय टँकरने दूषित पाणीपुरवठा होत असून, या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याबाबत तातडीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क क रीत घडल्या प्रकाराची माहिती दिली असता, त्यांनी आपले कर्मचारी तपासणीसाठी पाठवितो, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र शासकीय यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष करीत पाठ फिरवली व कोणीही अधिकारी इकडे फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व रात्री-अपरात्री कोणत्याही नागरिकाला त्रास झाला, तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला.या शासकीय टँकरने चिल्हावळी, शिवरकरवस्ती, जाधववस्ती, बनकरवाडी, बनकर मळा व गावठाण येथील नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. १५ जुलै रोजी पाण्याचा टँकर गावात आला असता, नागरिकांनी रात्री पाणी भरून घेतले व १६ जुलै रोजी सकाळपासून नियमितपणे या पाण्याचा वापर केला असता, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील रूपाली संतोष बनकर यांना या पाण्यात अळ्या असल्याची बाब लक्षात आली, यावर त्यांनी आपली इतर भांडी व परिसरातील शेजाऱ्यांची पाण्याची भांडी पाहिली असता, त्यातही अळ्या असल्याचे निर्दशनास आले. तोपर्यंत ज्या नागरिकांनी हे पाणी पिले होते त्यांना थंडी, ताप, हातपाय, पोटदुखणे आदी त्रास होऊ लागल्याचे समजले. तर, याचप्रमाणे गावात आज दुपारी अडीचच्या सुमारास पाण्याची ट्रीप घेऊन टॅँकर नियमितपणे आला असता, नागरिकांनी याची तपासणी केली, तर या टँकरमध्ये पाण्यात अळ्या असल्याचे पाहिले व या प्रकाराने संतप्त होत महिलांनी या टॅँकर ड्रायव्हरला तो तसाच दूषित पाण्याने भरलेल्या अवस्थेत उभा करण्यास सांगितले. मात्र, या टॅँकरचालकाने तेथून टॅँकरसह पळ काढला. (वार्ताहर)