विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

By अतुल चिंचली | Updated: June 10, 2025 18:19 IST2025-06-10T18:13:25+5:302025-06-10T18:19:13+5:30

Ajit Pawar on Ladki bahin Yojana: लोकसभेला आपला पराभव झाला, त्यावेळी लोकांची नाराजी दूर करणं हे काम होतं, म्हणून लाडक्या बहिणीचा विचार समोर आला

Ladki Bahin scheme brought forward to win assembly elections Ajit Pawar | विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पुणे: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आज वर्धापन दिन कार्यक्रम बालेवाडी येथे पार पडला. विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीचा विचार समोर आणला. आणि विजय मिळवला असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली आहे. लोकसभेला मागच्या वर्षी केवळ ४ जागा मिळाल्या. लोकसभेला आपला पराभव झाला. त्यावेळी लोकांची नाराजी दूर करणं हे काम होतं. त्यावेळी लाडक्या बहिणीचा विचार समोर आला. त्यावेळी ४० ते ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

अजित पवार म्हणाले, दर महिन्याच्या शेवटी आदिती मला सांगितले की, लाडक्या बहिणींची पैसे द्यायचे आहेत. आपण कुठे कमी पडलो काय चुकलं याच्यावर विचार केला.  40 ते 45 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे. राज्यात कधी बहुमत मिळाले नाही हे मान्य करावे लागेल. आपल्याला नेहमीच आघाडी करावी लागली. भाजपासोबत का गेले असे अनेकजण विचारतात. लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर लाडकी बहीण योजना पुढे आली. 

तुम्ही भाजपासोबत का गेले? असे अनेक जण विचारत असतात. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०१९ साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच महायुतीत जाण्याचा मुख्य हेतू होता.  विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्या दिवशी विचारांशी तडजोड होईल. तेव्हा पाया कमकुवत होईल .ही लढाई विचारांची असून ती विचारांनीच लढली जाईल अशी त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Web Title: Ladki Bahin scheme brought forward to win assembly elections Ajit Pawar