शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी कुऱ्हाडे बिनविरोध

By admin | Updated: February 18, 2017 02:44 IST

आळंदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी सविता रामशेठ गावडे आणि दिनेश रामदास घुले

शेलपिंपळगाव : आळंदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी सविता रामशेठ गावडे आणि दिनेश रामदास घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत या निवडी घोषित करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले, आमदार बाळा भेगडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी आज दुपारी येथील टाउन हॉलमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम सुरु केला. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या वतीने प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले तर शिवसेनेकडून शैला तापकीर या तिघांनी अर्ज दाखल केले होते. मात्र गिलबिले आणि तापकीर यांनी माघार घेतल्याने प्रशांत कुऱ्हाडे यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर स्वीकृत सदस्यपदासाठी निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली. दरम्यान स्वीकृत सदस्यपदासाठी एकूण सतरा जणांचे अर्ज आले होते. त्यामध्ये रामचंद्र रंधवे, प्रवीण बवले, दत्तू टेमगिरे, माधवी चोरडिया, भागवत आवटे, सुरेश झोंबाडे या सहा जणांचे अर्ज छाननीप्रक्रियेत प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी अवैध ठरविले. उर्वरित अकरा अर्जांपैकी भाजपाच्या वतीने दिनेश घुले आणि सेनेच्या वतीने सविता गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी भाजपाचे गटनेते पांडुरंग वहिले आणि सेनेचे गटनेते आदित्य घुंडरे यांनी मोलाची भूमिका बजावली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नगर परिषदेच्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. श्री ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनानंतर पदाधिकाऱ्यांची शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)