नऱ्हे येथे कोविड सेंटर सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST2021-03-22T04:09:25+5:302021-03-22T04:09:25+5:30

मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या परिसरातील काही भागात एका ...

Kovid Center should be started at Narhe | नऱ्हे येथे कोविड सेंटर सुरू करावे

नऱ्हे येथे कोविड सेंटर सुरू करावे

मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या परिसरातील काही भागात एका घरात पाच-सहा लोक राहत असून या भागात रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र अशा रुग्णांना होम आयसोलेशन करणे शक्य नाही. त्यांना कुटुंबापासून स्वतंत्र राहण्यास जागा नसल्याने काही रुग्ण नाईलाजाने एकाच घरात राहत असल्याचे दिसून येत आहे. नऱ्हे येथील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु केल्यास रुग्णांची सोय होईलच शिवाय संसर्ग रोखण्यास मदतही होणार आहे.

-----------

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याची आवश्यकता आहे. एकाच घरात पाच-सहा नागरिक राहत असल्याने रुग्णांना सध्या होम आयसोलेशनही करता येत नाही.

- सुशांत कुटे, विद्यमान सदस्य, ग्रामपंचायत नऱ्हे.

-----------------------

फोटो ओळ: कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात यावे, याबाबत उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन देताना नऱ्हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुशांत कुटे.

Web Title: Kovid Center should be started at Narhe