शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

HSC Exam Result 2025: महाराष्ट्रात कोकणचा झेंडा; लातूर पॅटर्न नापास, पुणे, मुंबई निकाल काय? पहा विभागनिहाय निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:39 IST

वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे

उद्धव धुमाळे 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल साेमवारी (दि. ५) जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. सर्वात कमी अर्थात तळामध्ये लातूर विभागाचा नंबर लागला असून, ८९.४६ टक्के निकाल लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षी पेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे यंदाच्याही निकालाने स्पष्ट झाले आहे. यामध्ये मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. विशेष करून कला शाखेचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी कमी झाला आहे.

लातूर पॅटर्न नापास 

राज्यात कधी काळी लातूर पॅटर्न मोठया प्रमाणावर चर्चेत आला होता. त्याचे निकालही उत्तम प्रकारे आले होते.  मात्र, मागील काही वर्षांपासून लातूर विभागाच्या निकालात घट असल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात अपेक्षेप्रमाणे कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, दुसरीकडे लातूरमध्ये सगळ्यात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्याची घट

बारावी परीक्षेला नाेंदणी एकूण - १४ लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत १.४९ टक्क्याची घट झाली  आहे. मागील वर्षी ९३.३७ टक्के निकाल लागला होता. 

विभागनिहाय टक्का - यंदा - गतवर्षी

पुणे -- ९१.३२ -- ९४.४४नागपूर -- ९०.५२ -- ९२.१२छत्रपती संभाजीनगर -- ९२.२४ -- ९४.८०मुंबई -- ९२.९३ -- ९१.९५कोल्हापूर -- ९३.६४ -- ९४.२४अमरावती -- ९१.४३ -- ९३नाशिक -- ९१.३१ -- ९४.७१लातूर -- ८९.४६ -- ९२.३६कोकण -- ९६.७४ -- ९७.९१

शाखानिहाय निकाल - यंदा - गतवर्षी

विज्ञान --९७.३५ -- ९७.८२वाणिज्य -- ९२.६८ -- ९२.१८व्यवसाय -- ८३.२६ -- ८७.७५कला -- ८०.५२ -- ८५.८८

शंभरटक्के निकाल लागलेले काॅलेज

यंदा - १,९२९गतवर्षी - २,२४६

निकाल शून्यटक्के लागलेले काॅलेज

यंदा - ३८गतवर्षी - २१

गुणवत्तेचा तक्ता 

९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी - ८३५२८५ ते ९० टक्के - २२,३१७८० ते ८५ टक्के -४६,३३६७५ ते ८० टक्के - ७४,१७२७० ते ७५ टक्के - १,०३,०७०६५ ते ७० टक्के - १,३१,८१२६० ते ६५ टक्के - १.८१,७५५४५ ते ६० टक्के - ६,००,२२७

उत्तीर्ण हाेणाऱ्या प्रमाण

मुली- यंदा - ६,२५,९०१ (९४.५८ टक्के) मुलांपेक्षा ५.०७ टक्के जास्त

दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

यंदा - ६,७०५ (९२.३८ टक्के)गतवर्षी - ६,५८१ (९४.२० टक्के)

काॅपी प्रकरणे किती?

यंदा - ३६४गतवर्षी - ३१३

१४७ विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी, विविध कारणांनी १४७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नागपूर येथील १३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या खालाेखाल पुणे ६, लातूर २, काेल्हापूर १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रlaturलातूर