शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:19 IST

पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणासाठी मिनी ट्रेन होती बंद

कांता हाबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नेरळ: पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणासाठी बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन गुरुवारपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या सेवेचा शुभारंभ नेरळ स्थानकात मोठ्या उत्साहात करण्यात आला. नेरळ जंक्शन स्थानकातून १९०७मध्ये ही मिनी ट्रेन सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने दरवर्षी १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते. यावर्षी मे महिन्यात पाऊस आला.

आणि १५ जून रोजी बंद होणारी मिनी ट्रेन २६ मेपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर मोसमी पाऊस लांबला आणि १५ ऑक्टोबर रोजी ही मिनी ट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू करू शकली नव्हती. परंतु, प्रचंड मागणी असल्याने मिनी ट्रेनच्या मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली.त्या चाचणीमध्ये २८ ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी २ नोव्हेंबरला पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनची प्रवास सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला होता. त्यानंतर ही मिनी ट्रेन गुरुवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली.

शटल सेवा पूर्वीसारखी सुरू

तब्बल २० दिवस उशिरा मिनी ट्रेन सुरू  झाली असून याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात नेरळ येथून सकाळी मालवाहू गाडी सोडली जाणार आहे. त्यानंतर ९ वाजता पहिली तर साडेदहा वाजता दुसरी प्रवासी गाडी नेरळ येथून माथेरानसाठी सोडली जाणार आहे. तर माथेरान येथून नेरळसाठी पहिली गाडी पावणे दोन वाजता आणि दुसरी गाडी ४ वाजता खाना होणार आहे. माथेरान ते अमन लॉज दरम्यान शटल सेवा पूर्वीसारखी सुरू राहणार आहे. यात शटल सेवेच्या दररोज सहा फेऱ्या होणार असून शनिवार, रविवार आठ फेऱ्या असणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

माथेरानसाठी सकाळी ०८:५०, सकाळी १०:२५नेरळसाठी दुपारी ०२:४५, दुपारी ०४:००

English
हिंदी सारांश
Web Title : Neral-Matheran Mini Train Restarts, Delighting Passengers; Schedule Announced

Web Summary : The Neral-Matheran mini train service resumed after a seasonal break. Service started with enthusiasm after cargo train testing. The schedule includes two daily trips from Neral to Matheran and back. Shuttle service between Matheran and Aman Lodge continues.
टॅग्स :Matheranमाथेरान