शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र की कोंडवाडा

By admin | Updated: February 2, 2015 23:10 IST

प्रसूती होऊन शस्त्रक्रिया झालेल्या ९ महिला व एक पुरुष एकाच खोलीत जमिनीवर टाकलेले, एका बाजूला पाण्याची टाकी, तर औषधांचे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले...

भोर : प्रसूती होऊन शस्त्रक्रिया झालेल्या ९ महिला व एक पुरुष एकाच खोलीत जमिनीवर टाकलेले, एका बाजूला पाण्याची टाकी, तर औषधांचे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले...हवेसाठी खिडकीही..सर्वत्र पसरलेला उग्रवास ,अशी अवस्था आहे नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची. हे आरोग्य केंद्र आहे की कोंडवाडा, हे येथे पाहणी केल्यानंतर प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत महिला व लहान बाळांना तेथे ठेवून वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका गायब असल्याचे वास्तव आहे.आज दुपारी भोर पंचायत समिती अंर्तगत असणाऱ्या या आरोग्य केंद्राला भेट दिली असता ही भयानक स्थिती समोर आली आहे. येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी येथील सेवेबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला. हे आरोग्य केंद्र संस्थानकालीन इमारतीत आहे. सदरची इमारत धोकादायक झाली असून, रुग्ण ठेवण्यास जागाच नाही. या केंद्रांर्तगत ४५ गावे येत असून, तीन वैद्यकीय अधिकारी मंजूर असताना २ कार्यरत आहेत. दररोज साधारणपणे ८० ते ९० जणांची ओ.पी.डी होते. केंद्रात प्रसूतीसाठी व शस्त्रक्रियेसाठी आलेल्या ९ महिलांना व एका पुरुषाला खोलीतील कॉट काढून जमिनीवर गादी टाकून शेजारी शेजारी ठेवले होते. तिथेच लहान बाळं, त्यांची माता व नातेवाईक होते. खिडकी नसल्याने उग्रवास येत असून, कोंडल्यासारखे होते. औषधांचे बॉक्स व पिण्याचे पाणी यामुळे अधिकच अडचण आहे. कोंडवाड्यात जनावरे बांधावी तसे रुग्णांना ठेवले होते. याचे काही घेणे-देणे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नाही. (वार्ताहर)आरोग्य केंद्राला गावात जागा उपलब्ध नाही. जुन्या एसटी डेपोजवळची जागा पशुसंवर्धन विभागाने जिल्हा परिषदेला देण्याची मागणी केली होती. त्या बदल्यात जिल्हा परिषदेने भोर येथील जागा पशुसंवर्धन विभागाला दिली आहे. मात्र, पशुसंवर्धन विभाग ती जागा देत नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत निधी असूनही रखडली आहे.जिल्हा परिषदेतून दुरुस्तीसाठी मंजूर केलेल्या ७ लाखांचे कामही निकृष्ट झाले आहे.- कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्यनसरापूर आरोग्य केंद्रात गैरहजर असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून नोटीस देऊन कारवाई करणार आहे.- डॉ. सुर्दशन मालाजुरे , तालुका आरोग्य अधिकारी