Pune Crime | लोणावळ्यात रेल्वे ट्रॅकजवळ युवकावर चाकू हल्ला; टेबल लॅन्ड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:55 IST2023-01-23T16:50:50+5:302023-01-23T16:55:02+5:30
लोणावळ्यातील एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना...

Pune Crime | लोणावळ्यात रेल्वे ट्रॅकजवळ युवकावर चाकू हल्ला; टेबल लॅन्ड येथील घटना
लोणावळा (पुणे) : तुम्ही या रस्त्याने पुढे जायचे नाही, असे म्हणत टेबल लॅन्ड येथे रेल्वे ट्रॅकजवळ लोणावळ्यातील एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (२० जानेवारी) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमित सलेंदर चौरसिया (वय २८, रा. पांगोळी, लोणावळा, मूळ रा. सिहटीकर, ता. खलीलाबाद, जि. संतकबीर नगर, राज्य उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी अमित चौरसिया हे टेबल लॅन्डजवळून जात असताना एका २५ ते ३० वयोगटातील अनोळखी युवकाने काही एक कारण नसताना तुम्ही या रस्त्याने जायचे नाही, असे बोलून फिर्यादीसमोर येऊन त्याच्या हातातील चाकूसारख्या हत्याराने फिर्यादीच्या पोटात मारून गंभीर जखमी केले. २२ जानेवारी रोजी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार म्हेत्रे घटनेचा तपास करत आहेत.