Indapur: डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:02 IST2024-10-15T14:01:58+5:302024-10-15T14:02:57+5:30
रात्रीच्या वेळी माळरान परिसरात दोघे मित्र एकत्र बसले असता दोघांत भांडण झाले

Indapur: डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना
भिगवण : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील विरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी माळरान परिसरात दोघे मित्र एकत्र बसले असता दोघांत भांडण झाल्यावर डोक्यात दगड घालून मित्राचा खून केल्याची घटना सोमवारी (दि,१४) रोजी रात्री घडली.
या घटनेमध्ये विजयकुमार विठ्ठलराव काजळे ( वय ४५ रा. मूळ गाव निरगुडे हल्ली मदनवाडी ता. इंदापूर, जि. पुणे) असे खून झालेल्या पुरुषाचे नाव आहे. खून केल्याप्रकरणी त्याचा मित्र राज भगवान शिंदे (वय २०, रा. मदनवाडी ता. इंदापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
दोघे मित्र विरवाडीच्या माळरान परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यांच्यात काहीतरी किरकोळ कारणावरून वादविवाद झाला. वादाचे रूपांतर हातापायी करण्यापर्यंत गेले. त्यात राज शिंदे याने विजयकुमार काजळे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी तातडीने राजला ताब्यात घेतले. आता गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.