शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: February 18, 2017 02:55 IST

चाकण येथील तळेगाव चौकात भरधाव वेगात आलेल्या कंटेनरची दुचाकीस जोरदार ठोस बसल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची दुर्घटना गुरुवारी

आंबेठाण : चाकण येथील तळेगाव चौकात भरधाव वेगात आलेल्या कंटेनरची दुचाकीस जोरदार ठोस बसल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची दुर्घटना गुरुवारी (दि. १६ ) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.आशिषकुमार गिरिजाप्रसाद गुप्ता (वय ३०, रा. भुजबळआळी, चाकण) असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. या कंटेनर चालकावर शुक्रवारी (दि. १७) सकाळी चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंटेनरचालक तुकाराम अंबादास सोनवणे (वय ४३, लोणार, जि. बुलडाणा) हा अपघातानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तसाच पुढे पसार झाला. मात्र चाकण पोलिसांनी राजगुरुनगर पोलिसांच्या मदतीने संबंधित चालकास सुमारे चौदा किलोमीटर पाठलाग करून खेड घाटातून ताब्यात घेतले आहे.अपघातात ठार झालेला आशिषकुमार गुप्ता हा चाकण मिंडा कंपनीत नोकरीस होता. कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना हा अपघात घडला. मध्यरात्री एकच्या सुमारास कंपनीतून कामावरून सुटल्यानंतर घरी निघालेला आशिषकुमार गुप्ता त्याची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (एमएच १४ एफ. झेड. ४३५३) वरून तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे जात होता. चौकात रात्रीच्या वेळी सिग्नल बंद असल्याने घाईघाईत चौक ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे बाजूकडून नाशिककडे जात असलेल्या भरधाव कंटेनरची (एमएच १२ एच.डी. ५८३०) चाकणच्या तळेगाव चौकात सिग्नलजवळ दुचाकीस जबरदस्त ठोस बसली. यात दुचाकीस्वार आशिषकुमार कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. अपघातानंतर संबंधित चालकाने कंटेनर तसाच पुढे भरधाव वेगात राजगुरुनगर दिशेने पळविला. अपघाताची माहिती तत्काळ काही प्रत्यक्षदर्शिंनी पोलिसांना दिली. (वार्ताहर)