शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘खरीप’ संकटात!

By admin | Updated: July 14, 2014 05:07 IST

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, ४० टक्के भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत.

पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, ४० टक्के भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत. तर पुरंदर, बारामती, इंदापूर, शिरूर व दौंडमध्ये येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास तेथील शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम कोरडा घालवावा लागणार आहे. त्याऐवजी त्यांनी थेट रब्बी पिके घ्यावीत, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई बैठकीत जिल्ह्यातील कृषी परिस्थितीचादेखील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ११ जुलैअखेर केवळ दोन टक्के पेरण्या झालेल्या असून, खरिपाची स्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात भाताचे ६० हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यासाठी साडेपाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार केल्या जातात. पावसाने ओढ दिल्याने त्यातील ४० टक्के भात रोपवाटिका बाधित झाल्या असून, त्यातील २५ ते ३० टक्के वाटिका उद्ध्वस्त झाल्या आहेत. गेले काही दिवस होत असलेल्या रिमझिम पावसामुळे काही वाटिकांना जीवदान मिळाले आहे.’’पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत असलेल्या ठिकाणी शेतकरी गटांनी एकत्र येऊन भात रोपवाटिका केल्यास त्यांना बियाणे, खतांसाठी ४८ हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात येईल. तसेच, रोपांचा कालावधी कमी होण्यासाठी रहू पद्धतीने वाटिका करावी. बियाणे २४ तास पाण्यात भिजत ठेवून, नंतर ते भिजलेल्या गोणपाटात दोन दिवस ठेवावे. कोंब आलेले बियाणे वाटिकेच्या ताफ्यावर टाकल्यास त्याचा फायदा होतो. पेरणी लांबल्याने एकाऐवजी तीन ते चार रोपांची पेरणी करावी लागेल. मात्र, पाऊस लांबल्यास १५ ते २० जुलैदरम्यान डोंगरमाथ्यावरील जमिनीत भाताऐवजी नाचणी घ्यावी. भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, तसेच खेड व आंबेगावच्या काही भागांत ही पद्धत वापरावी, असा सल्ला बोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)