चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 18:48 IST2021-08-15T18:41:27+5:302021-08-15T18:48:38+5:30

मंचरमधील धक्कादायक घटना, चार जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल

Kelly beaten on suspicion of theft; 24-year-old dies | चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देरुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच तरुण झाला मृत्यू

मंचर : चोरी केल्याच्या संशयावरून जबर मारहाण केल्यामुळे विकी गणपत भोसले (वय २४)  या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मार्तंड उर्फ योगेश गणपत भोसले यांनी फिर्याद दिली आहे. गणेश पांडुरंग बोऱ्हाडे, संतोष सुखदेव जाधव, सार्थक संजय वळसे व पिंटू उर्फ रवींद्र दौलत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौदा ऑगस्ट रात्री आठ ते नऊच्या सुमारास मंचर शहरातील मुळेवाडी रस्त्यावर आरोपींच्या किराणा दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून विकी भोसले यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठी, क्रिकेटची बॅट व कमरेच्या पट्ट्यांनी जबर मारहाण केली होती. विकी यास तात्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे नेऊन प्राथमिक औषध उपचार केले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. पुणे येथे घेऊन जात असताना रस्त्यात खेडच्या पुढे विकीची हालचाल बंद झाली. त्यामुळे रस्त्यात असणाऱ्या चाकण शासकीय रुग्णालयात विकी याला नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास संदर्भात मंचर पोलिसांना सूचना केल्या आहेत. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Kelly beaten on suspicion of theft; 24-year-old dies