शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पुण्यात शिवाजीनगरपेक्षा कात्रज, खडकवासला येथे सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:30 IST

गेल्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या पावसानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळल्यानंतरही वर्षभरात ही केंद्रे सुरु होऊ शकली नाही...

ठळक मुद्देवर्षानंतरही पर्जन्य मापन केंद्र नाहीच : शहरातील चित्र होत नाही स्पष्टकिमान येत्या काळात तरी या भागात स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र सुरु होण्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज

पुणे : हवामान विभागाकडून शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण येथेच पर्जन्य व तापमानाची नोंद केली जाते. शिवाजीनगर येथे पडलेला पाऊस हा पुणे शहराचा पाऊस म्हणून मोजला जातो. प्रत्यक्षात त्यापेक्षा कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. मात्र, त्याचवेळी शहराचा दक्षिण भाग असलेल्या कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असूनही त्या भागातील पावसाची नोंद शासकीय पातळीवर होत नसल्याने पुणे शहरातील पावसाचे नेमके चित्र स्पष्टपणे समोर येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या पावसानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव होता. त्याला मान्यता मिळल्यानंतरही वर्षभरात ही केंद्रे सुरु होऊ शकली नाही. 

१ जून ते ३० सप्टेंबर हा चार महिन्याचा पाऊस मॉन्सूनचा पाऊस म्हणून मोजला जातो. त्यानंतरचा पाऊस हा पर्जन्योत्तर पाऊस गृहित धरला जातो. १ जून ते १९ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीनगर येथे १ हजार ४ मिमी पावसाची नोंद झाली असून लोहगाव येथे १०४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पाषाण येथे ९९०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आशय मेजरमेंटनुसार याच काळात कात्रज येथे ११२६.२ मिमी, खडकवासला येथे १२४०.६ मिमी, वारजे येथे ९५८.३ मिमी आणि कोथरुड येथे ९५०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.१ ऑक्टोबरपासून १९ ऑक्टोबरपर्यंतही शिवाजीनगर पेक्षा खडकवासला व कात्रज भागात अधिक पावसाची नोंद झाली आहे.

शिवाजीनगरपेक्षा सलग दुसऱ्या वर्षी कात्रज भागात जास्त पाऊस झाला असला तरी अजूनही त्या भागात पर्जन्य मापन केंद्र सुरु होऊ शकले नाही. २५ सप्टेंबरच्या प्रलयकारी पावसानंतरही जिल्हा प्रशासनाने हवामान विभागाकडे पाठपुरावा न केल्याने हे केंद्र सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे या भागातील अधिकृत पावसाची शासकीय पातळीवर नोंद होऊ शकत नाही. सध्या या भागात असलेल्या खासगी स्वयंचलित केंद्रामुळे या भागात किती पाऊस पडतो याची किमान काही माहिती उपलब्ध होत आहे. किमान येत्या काळात तरी या भागात स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र सुरु होण्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.़़़़़़़़़१ जून ते १९ ऑक्टोबरपर्यंत पडलेला एकूण पाऊस (मिमी)शिवाजीनगर        १००४.६लोहगाव               १०४४पाषाण                 ९९०.३कात्रज                 ११२६.२खडकवासला        १२४०.६वारजे                 ९५८.३कोथरुड              ९५०.४ ... शहरात आणखी चार दिवस वृष्टीमध्यरात्रीनंतर शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शहरातील सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सकाळपर्यंत लोहगाव येथे ५६ मिमी, शिवाजीनगर येथे ३२.६, पाषाण येथे ३७.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी कात्रज ५४, खडकवासला ६२, वारजे ३८, कोथरुड ३२.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दुपारी ३ वाजल्यानंतर शहरात पुन्हा एकदा मुसळधार वृष्टी झाली. काही वेळ झालेल्या या पावसाची शिवाजीनगर येथे १५ मिमी इतकी नोंद झाली.त्याचवेळी लोहगाव येथे अगदी तुरळक पाऊस झाला.कात्रज येथे १४ मिमी, खडकवासला १८, वारजे ४़६, कोथरुड येथे ९. ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान