दुर्दैवी! कबड्डीपटुंच्या गाडीला विजापूर येथे अपघात; दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:33 PM2021-03-17T14:33:31+5:302021-03-17T15:12:25+5:30

कबड्डीपट्टू मंगळवारी(दि १६) रात्री एका स्पर्धेसाठी हुबळीच्या दिशेने १३ जण निघाले होते.

Kalamb Kabaddi player's car accident at Bijapur; Death of both; Two serious | दुर्दैवी! कबड्डीपटुंच्या गाडीला विजापूर येथे अपघात; दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर 

दुर्दैवी! कबड्डीपटुंच्या गाडीला विजापूर येथे अपघात; दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर 

googlenewsNext

वालचंदनगर : कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी(दि १७) पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला.ट्रक आणि तवेरा गाडीची धडक होवुन झालेल्या गंभीर अपघातात दोघा कबड्डीपटुंचा मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कबड्डीपट्टू मंगळवारी(दि १६) रात्री एका स्पर्धेसाठी हुबळीच्या दिशेने १३ जण निघाले होते.या दरम्यान, विजापुरच्या पुढे ५० किमी अंतरावर गाडीला बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि तवेरा गाडीची धडक होवुन  अपघात झाला. त्यामध्ये २ कबड्डीपट्टू यांचा जागीच मृत्यू झाला.सोहेल सय्यद (वय २२,,महादेव आवटे (वय २०) अशी या कबड्डीपट्टुंची नावे असल्याचे समजते. अन्य माहिती उपलब्ध होवु शकली नाही. तर दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.मात्र,मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी खेळाडुंची नावे समजु शकलेली नाहीत. गंभीर सर्व खेळाडूंना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी कोल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिध्द आहे.येथे कबड्डीसाठी अनेक विद्यार्थी येतात. या संघात अनेक राष्ट्रीय कबड्डीपट्टु घडले आहेत.अनेकजण कबड्डीच्या बळावर पोलीस भरती देखील झाले आहेत. बुधवारी झालेल्या अपघाताची माहिती समजल्यानंतर परीसरात खळबळ उडाली.कळंबमधुन तातडीने ग्रामस्थ विजापुरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
—————————————

Web Title: Kalamb Kabaddi player's car accident at Bijapur; Death of both; Two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.