अखेर हवेली प्रांताधिकारी पदाचा ज्योती कदम यांनी पदभार स्वीकारला

By Admin | Updated: September 27, 2016 04:17 IST2016-09-27T04:17:04+5:302016-09-27T04:17:04+5:30

हवेली प्रांत अधिकारी पदावर शासनाने एकाच वेळी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला होता. अखेर या पदावर अंतिमरित्या ज्योती कदम यांची नियुक्ती

Jyoti Kadam of the Haveli provincial office was finally accepted | अखेर हवेली प्रांताधिकारी पदाचा ज्योती कदम यांनी पदभार स्वीकारला

अखेर हवेली प्रांताधिकारी पदाचा ज्योती कदम यांनी पदभार स्वीकारला

पुणे : हवेली प्रांत अधिकारी पदावर शासनाने एकाच वेळी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला होता. अखेर या पदावर अंतिमरित्या ज्योती कदम यांची नियुक्ती करण्यात आली. कदम यांनी हवेली प्रांताधिकार पदाची सूत्रेदेखील स्वीकारली असून, कामाला
सुरुवात केली आहे. सातबारा संगणकीकरण व प्रलंबित केसेस काढण्यावर भर देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
राज्य शासनाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे पूर्ण होणाऱ्या व स्व-जिल्हा असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या.
यामध्ये हवेली प्रांताधिकारीपदी सुरुवातीला संजीव देशमुख यांची नियुक्ती केली. देशमुख यांनी
कामाला सुरुवातदेखील केली होती. परंतु आठ तासात शासनाने आॅर्डर बदलून, हवेली प्रांताधिकारीपदी ज्योती कदम यांनी नियुक्ती केली. याबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर शुक्रवारी हवेली प्रांताधिकारी पदी ज्योती कदम यांची अंतिम आॅडर काढण्यात आली.
कदम यांनी यापूर्वी नायब तहसीलदार, तहसीलदार म्हणून पुणे जिल्ह्यात काम केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jyoti Kadam of the Haveli provincial office was finally accepted