बिगर आदिवासी समाजाला न्याय दिला जाईल : डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:18+5:302021-02-05T05:04:18+5:30

आंबेगाव तालुक्यातील अनुसूची क्षेत्रातील पेसा हक्क कृती समितीचे शिष्टमंडळ शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भेटले. ...

Justice will be given to non-tribal community: Dr. Amol Kolhe | बिगर आदिवासी समाजाला न्याय दिला जाईल : डॉ. अमोल कोल्हे

बिगर आदिवासी समाजाला न्याय दिला जाईल : डॉ. अमोल कोल्हे

आंबेगाव तालुक्यातील अनुसूची क्षेत्रातील पेसा हक्क कृती समितीचे शिष्टमंडळ शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भेटले.

या वेळी खासदार कोल्हे यांनी आदिवासी बांधवांच्या अस्तित्वाला धक्का न लावता व त्यांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता या भागात राहणाऱ्या बिगर आदिवासी समाजाच्या नागरिकांसाठी वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून त्यात काही वेगळा मार्ग काढता येतो का, याबाबत प्रशासकीय अभ्यास करून मग मार्ग काढला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला त्यांनी दिले.

या वेळी पेसा हक्क कृती समितीचे अध्यक्ष डी. बी बोऱ्हाडे,उपाध्यक्ष अमोल अंकुश,मंगेश बोऱ्हाडे, सल्लागार आत्माराम बोऱ्हाडे ,भरत फदाले,शंकरशेठ शहा व महासचिव गौतमराव खरात उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यातील अनुसूची क्षेत्रातील पेसा हक्क कृती समितीचे शिष्ठ मंडळ शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भेटून चर्चा केली.

Web Title: Justice will be given to non-tribal community: Dr. Amol Kolhe