शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी जेजुरीनगरी सज्ज

By admin | Updated: February 16, 2015 04:27 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीत येत्या मंगळवारी (दि. १७) महाशिवरात्री यात्रा असून, यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत येत्या मंगळवारी (दि. १७) महाशिवरात्री यात्रा असून, यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त खंडोबा गडकोटातील मुख्य मंदिराचा कळसातील शिवलिंग, (स्वर्गलोक) मुख्य गाभारा (भूलोक) आणि गाभाऱ्यातील डाव्या कोपऱ्यातील तळघरातील शिवलिंग (पाताळलोक) ही तिन्ही ठिकाणे दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी खुली असतात. असा योग वर्षातून केवळ महाशिवरात्रीलाच येत असल्याने भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे. भाविकांना देवदर्शन सुलभ व सुरक्षित व्हावे, म्हणून जेजुरी पोलीस ठाण्यात स. पो. नि. रामदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली देव संस्थानचे विश्वस्त, पुजारी सेवकवर्ग व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीला मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त संदीप घोणे, अ‍ॅड. वसंत नाझिरकर, जेजुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, नगरसेवक अमोल सातभाई, पुजारी व ग्रामस्थ नितीन बारभाई, रवींद्र बारभाई, दिलीप मोरे, सतीश कदम, रमाकांत मोरे, अनिल मोरे आदी पुजारी, सेवेकरी, देव संस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र गर्दीचा ओघ पाहता गाभाऱ्यातील तळ्घरातील शिवलिंग मंगळवारी (दि. १७) सकाळी १० ते ६ या काळात केवळ मुख दर्शनासाठीच खुले ठेवण्यात येणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीत प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी जेजुरीत भाविकांची वाढती गर्दी पाहता पूजा अभिषेक विधीसाठी भंडारगृहात नव्या मूर्ती तयार करून तसे नियोजन करण्याचा मानस आहे. (वार्ताहर)