नीलेश घायवळ टोळीतील गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 20:38 IST2025-11-08T20:37:34+5:302025-11-08T20:38:58+5:30

घायवळ टोळीतील गुंड वाघ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पसार झाला होता

Jayesh Wagh, a gangster from Nilesh Ghaywal gang, arrested from Thane district | नीलेश घायवळ टोळीतील गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यातून अटक

नीलेश घायवळ टोळीतील गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यातून अटक

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी नीलेश घायवळ टोळीतील सराईताला खंडणी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातून अटक केली. जयेश कृष्णा वाघ (३६, रा. विठ्ठल मंदिरासमोर, केळेवाडी, कोथरूड), असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. 

कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. घायवळ टोळीतील गुंड वाघ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. पसार झालेल्या वाघ याचा शोध घेण्यात येत होता. वाघ हा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या कोंडारी गावात वास्तव्यास असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोंडारी गावात लपलेल्या वाघ याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलिस कर्मचारी अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, अमर पवार, नितीन बोराटे, अविनाश कोंडे, बबलू मांढरे, नागनाथ राख यांनी ही कारवाई केली. 

Web Title : नीलेश घायवळ गिरोह का अपराधी जयेश वाघ ठाणे में गिरफ्तार

Web Summary : कोथरुड गोलीबारी मामले में वांछित नीलेश घायवळ गिरोह का सदस्य जयेश वाघ ठाणे जिले में गिरफ्तार। मकोका के तहत मामला दर्ज, फरार था। पुलिस ने कोंडारी गांव में छिपे हुए पाया।

Web Title : Nilesh Ghaywal Gang's Criminal Jayesh Wagh Arrested in Thane

Web Summary : Jayesh Wagh, a member of the Nilesh Ghaywal gang wanted in a Kothrud shooting case, was arrested in Thane district. He was booked under MCOCA and had been absconding. Police found him hiding in Kondari village.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.