शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

"दिवस बदलत असतात लक्षात राहूद्या..." मविआची पुण्यात सभा, उमेदवार बसले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 1:42 PM

देशात अन्याय पद्धतीने सगळ्या संस्था वापरण्याची पद्धत वाढत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला...

पुणे : आज पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये बारामतीसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे आणि पुण्यासाठी रविंद्र धंगेकरांकडून अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडची सभा झाली.

इलेक्ट्रोल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाले. पण विरोधक ते संसदरत्न पुरस्कार किती साधे आहेत हे दाखवण्यात धन्यता मानत आहेत. सध्याच्या सरकारने गरीब वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूंवर कर लावला आहे. जीएसटीच्या माध्यमातून सरकार सामान्य जनतेला लुटत आहेत. तसेच इलेक्ट्रोल बॉन्ड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

महायुतीकडे आत्मविश्वासाची कमतरता

भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाही. आहे ते उमेदवार बलदले जात आहेत. काही उमेदवार तर आज सकाळी ठरले आहेत. महायुतीकडे आत्मविश्वासाची कमतरता आहे. देशात अन्याय पद्धतीने सगळ्या संस्था वापरण्याची पद्धत वाढत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सचिन आहिर, विश्वजीत कदम उपस्थित होते.

स्टेजवर जागा नसल्याने उमेदवार बसले रस्त्यावर-

पाटील म्हणाले, आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा पुण्यात झाल्या. महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलिसांनी जी जागा दिली ती खूपच अपुरी होती. आमच्या तीन पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत हे माहित असतानाही पोलिसांनी मोठी जागा दिली नाही. पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केली आहे. पदोपदी होणाऱ्या अन्यायाकडे पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे. जागा नसल्याने आमचे उमेदवार रस्त्यावर बसले आहेत. काही हरकत नाही दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवा, असंही पाटील मिश्किलपणे म्हणाले. स्टेजवर जागा कमी असल्याने निवडणुकीतील उमेदवार सुप्रिया सुळे, रविंद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे स्टेजसमोरील जागेत खाली बसले होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPuneपुणेPoliceपोलिसpune-pcपुणेbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४