आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग; खंडेरायाचा भंडारा भेसळयुक्त, भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:37 IST2025-04-01T15:34:46+5:302025-04-01T15:37:38+5:30

गेल्या काही वर्षांपासून "यलो पावडर "नॉट ईडीबल" ट्रमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा जत्रा यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर विकला जातोय

It has been revealed that Jejuri Bhandara is adulterated it was said that it is not good for the citizens | आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग; खंडेरायाचा भंडारा भेसळयुक्त, भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग; खंडेरायाचा भंडारा भेसळयुक्त, भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

जेजुरी: कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक जत्रा यात्रा उत्सवामध्ये भंडारा -आणि खोबरे याला अनन्य साधारण महत्व आहे .राज्यातून येणारा भाविकभक्त येथे दाखल  होत  मोठ्या श्रद्धेने भंडारा खरेदी करतो देवाच्या चरणी अर्पण करतो. तळीभंडारा ,जागरण गोंधळ- कोटांबा पूजन -लंगर तोडणे आदी धार्मिक विधी करत हा भंडारा कपाळी लावतो. प्रसाद म्हणून भाविक भक्षणही करतो. काही भाविक जेजुरीतून खरेदी केलेला भंडारा वर्षभर देवघरात ठेवून पावित्र्य जपतो. या सोनपिवळ्या भंडाऱ्यामुळेच "सोन्याची जेजुरी "हे नाव प्रचलित झाले आहे .मंगल कार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. 
 
मात्र ,गेल्या काही वर्षांपासून या भंडाऱ्याला भेसळीचे ग्रहण लागले असून "यलो पावडर " नॉट ईडीबल" ट्रमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा जत्रा यात्रा उत्सव काळात  मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

गेली अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. याबाबत देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, पत्रकार प्रकाश फाळके यांनी शुक्रवारी (दि.२८) मुंबई येथे अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेत यावर शासनाकडून निर्णय घेत ठोस उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. . हळद आणि कुंकू यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत भेसळयुक्त भंडारा हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे .लवकरच यावर ठोस निर्णय घेत उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील असे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिले .

Web Title: It has been revealed that Jejuri Bhandara is adulterated it was said that it is not good for the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.