पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:17 IST2021-02-28T04:17:40+5:302021-02-28T04:17:40+5:30

पुणे : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या करून अनेक दिवस झाले आहेत. या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ...

Investigate Pooja Chavan's suicide | पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी करा

पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी करा

पुणे : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या करून अनेक दिवस झाले आहेत. या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड जबादार असल्याचा आरोप होत आहे. मात्र, मुख्यमंत्री पूजाला न्याय देण्याऐवजी त्यांच्या मंत्र्यांना वाचवत आहेत. तत्काळ राठोड यांची मंत्रिपदावरून हाकलपट्टी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आज पुणे भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी आशिष गार्डन ते कोथरूड पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.

या वेळी आंदोलनकर्त्यां महिलांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना निवेदन दिले. या वेळी शहराध्यक्षा अर्चना पाटील, सरचिटणीस आशा बिववे, कांचन कुंबरे, रेखा चोंधे, सोनाली भोसले, सुप्रिया खैरनार, ज्योती जावळकर, संगीता राजगुरू, अश्विनी पवार, रेश्मा सय्यद, विनिता काळे, वंदना कोदरे, डॉ. सुप्रिया कुलकर्णी, वृषाली दुबे आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या.

हे सरकार तीन आघाडी पक्षांचे नसून ते बिघाडाचे सरकार आहे. असा आरोप करून विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करीत नाही. याचा निषेध केला जात आहे. राठोड यांच्यावर जोवर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत आंदोलन केले जाईल. आजचे हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत. जर यावर काही काही निर्णय घेतला नाही तर आंदोलनची दिशा बदलली जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यां महिलांनी या वेळी दिला.

Web Title: Investigate Pooja Chavan's suicide