पुणे : बहुतांश लोकांना ' कडक फुलचंद" पान खाण्याची सवय आहे. हे पान खाल्ल्यावर नशा येत असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारीनंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर येथील मैफिल पान हाऊसवर छापा टाकला आणि पानामध्ये टाकण्यात आलेली अंमली पदार्थाची अंश मिश्रित भुकटी (पावडर) जप्त केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका दाम्पत्याला अटक केली.
कैलास दत्तात्रय मांढरे (वय ५४) आणि अनुराधा कैलास मांढरे (वय ५४, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हिंजवडी येथील जांबेगावातील एका कारखान्यात याचे उत्पादन केले जात असल्याचे निष्पन्न झाले असून, या कारखान्यातून ६ लाख ६३ हजार रुपयांचा अंमली पदार्थ मिक्स पावडर, काळ्या रंगाचा अंमली पदार्थ मिश्रित पातळ पदार्थ, ३ मोबाईल, एक कार असा माल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन ‘कडक फुलचंद’ पानामुळे गुंगी येत असल्याच्या तक्रार येत होत्या. हे पान खाल्ल्यावर नशा येत असल्याने त्याला ‘कडक फुलचंद’ म्हटले जात होते. याची माहिती मिळाल्यावर कदम वाक वस्तीमधील मैफिल पान हाऊस येथे छापा टाकला. त्यात पानामध्ये मिसळली जाणारी पावडर मिळाली. अमली पदार्थ विरोधी पथकाकडे आता पोर्टेबल ड्रग्ज टेस्टींग किट आले आहे. त्यावर टेस्ट केले असता त्यात अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स, मेथॅम्फेटामाइन हे चार अंमली पदार्थांचे अंश मिळाले. ही पावडर कोठे मिळते याचा तपास केला असताना हिंजवडी परिसरातील जांबेगाव येथील चैतन्य फुड गोडाऊनमध्ये ती तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. कैलास मांढरे हा अमली पदार्थ मिश्रित भुकटी उत्पादन व विक्री करीत असल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांच्या सहकार्याने चैतन्य फुड गोडाऊनवर छापा घातला. तेव्हा तेथे सुपारी, कात यांच्यासह अंमली पदार्थांचा अंश असलेली पावडर मिळाली. त्यांचे सॅम्पल रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांची विक्री, तसेच तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत अमली पदार्थांची तपासणी, तसेच विश्लेषण करण्यासाठी ‘ड्रग अॅनलायजर किट’चा पहिल्यांदाच वापर करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
Web Summary : Police in Pune arrested two for selling 'Kadak Fulchand' betel leaf laced with drugs. A factory in Hinjawadi was raided, yielding ₹6.63 lakh worth of drug-laced powder. The leaf caused intoxication due to amphetamine, benzodiazepines, opiates, and methamphetamine traces.
Web Summary : पुणे में पुलिस ने ड्रग्स युक्त 'कड़क फुलचंद' पान बेचने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया। हिंजवडी में एक फैक्ट्री पर छापा मारा गया, जिसमें ₹6.63 लाख की ड्रग्स युक्त पाउडर बरामद हुई। इस पान में एम्फ़ैटेमिन, बेंजोडायजेपाइन, ओपियेट्स और मेथैम्फेटामाइन के अंश पाए गए।