शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ

By admin | Updated: September 12, 2015 04:13 IST

लोहगाव विमानतळाचा विस्तार हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून, स्मार्ट ‘पुणे’ जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

पुणे : लोहगाव विमानतळाचा विस्तार हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून, स्मार्ट ‘पुणे’ जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा निश्चित करून सर्व तांत्रिक मान्यता घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव सादर करा, अशा सूचना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, दिल्लीत झालेल्या बैठकीत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या विषयावर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत पुण्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानाची उड्डाणे वाढली आहेत. येथे धावपट्टीत वाढ करून विमान बोर्इंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विमानतळ प्रशासनाने विनंती केली आहे. सध्या बोर्इंगसाठी इंडियन एअर फोर्सच्या ताब्यात असलेली दहापैकी चार एकर जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु धावपट्टी विस्तारासाठी काही खासगी जागा देखील घ्यावी लागणार आहे. एअर फोर्सच्या सरावाच्या वेळापत्रकाला धक्का न लावता विमानाचे लँडिंग वाढविण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळाचा तात्पुत्या स्वरूपासाठी विस्तार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात फॉक्सकॉनसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर व शासनाने पुणे शहराला दिलेल्या स्मार्ट सिटीचा दर्जा यामुळे जिल्ह्यासाठी आता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय महत्त्वाचा झाला आहे. यामुळेच गडकरी यांनी चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा निश्चित करून व त्यासाठी आवश्यक तांत्रिक मान्यता घेऊन अंतिम अहवाल त्वरित शासनाला सादर करण्यास सांगितले आहे.