शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांनी गिरविले आॅनलाइनचे धडे

By admin | Updated: January 24, 2017 02:50 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन अर्ज कसा भरायचा, अचूक माहिती भरण्यासाठी काय दक्षता घ्यावी, त्याची प्रिंट

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन अर्ज  कसा भरायचा, अचूक माहिती भरण्यासाठी काय दक्षता घ्यावी, त्याची प्रिंट कुठे जमा करायची, अशा अनेक शंकांचे समाधान  करून घेत इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सायबर कॅफेचालकांनी आॅनलाइन प्रशिक्षणाचे धडे गिरविले. महापालिका प्रशासनाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी आॅनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सर्वांसाठी नवीन आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून याची माहिती दिली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, आॅनलाइन संगणक प्रणाली, नामनिर्देशपत्रासोबत सादर करावयाची कागदपत्रे अपलोड करणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे आदींची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी, संगणक विभागाचे प्रमुख राहुल जगताप, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणाबरोबरच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी मदत कक्ष उभारला जाणार आहे. तिथे उमेदवारांना माहिती मिळू शकेल.’’पूर्वी निवडणुकीचा फॉर्म भरताना संपत्ती, छोटे कुटुंब आदी प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे जोडावे लागत होते. आता ही प्रतिज्ञापत्र एकत्रपणे देता येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. एकूण ४ फॉर्म भरावे लागणार आहेत. उमेदवारांना त्यांच्या माहितीचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. या वेळी उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अनेक शंका प्रशासनाला विचारल्या. एखाद्या इच्छुक उमेदवाराचे पक्षामध्ये ऐनवेळी बदल झाला तर काय करायचे, आॅनलाइन फॉर्म भरताना चुका झाल्या तर फॉर्म रद्द होणार नाही ना, एकदा फॉर्म सेव्ह केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर काय करायचे आदी शंका उपस्थितांकडून विचारण्यात आल्या. सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर त्याच्या प्रिंटआऊट काढून त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा कराव्या लागणार आहेत. आॅनलाइन प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले तरी संगणक, इंटरनेट याची चांगली माहिती असणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊनच अर्ज भरावा लागेल, अशी भावना या वेळी इच्छुकांकडून व्यक्त करण्यात आली.