छतावर सोलर प्रकल्प लावा; ७८ हजारांचे अनुदान मिळवा, सरकारची नवी योजना

By नितीन चौधरी | Published: February 26, 2024 06:15 PM2024-02-26T18:15:28+5:302024-02-26T18:16:37+5:30

राज्यात आतापर्यंत रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १ लाख २७ हजार ६४६

Install rooftop solar projects Get subsidy of 78 thousand new scheme of Govt | छतावर सोलर प्रकल्प लावा; ७८ हजारांचे अनुदान मिळवा, सरकारची नवी योजना

छतावर सोलर प्रकल्प लावा; ७८ हजारांचे अनुदान मिळवा, सरकारची नवी योजना

पुणे : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत रुफ टॉप सोलर सिस्टिम बसविलेल्या वीज ग्राहकांची संख्या १ लाख २७ हजार ६४६ झाली असून त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता १ हजार ९०७ मेगावॅट झाली आहे.

देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केली. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॅटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. अर्थात एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल.

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Install rooftop solar projects Get subsidy of 78 thousand new scheme of Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.