शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शिरवली केंद्राची इमारत पडून

By admin | Updated: July 6, 2015 04:32 IST

वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारत पाणी तसेच वीजजोड नसल्याने आरोग्य विभागाने इमारत ताब्यात घेतलेली नाही.

भोर : तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील आदिवासी नागरिकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने शिरवली हि.मा. (ता. भोर) येथे वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या इमारत पाणी तसेच वीजजोड नसल्याने आरोग्य विभागाने इमारत ताब्यात घेतलेली नाही. डॉक्टरांचीही नेमणूक अद्याप न झाल्याने ही इमारत नुसती नावालाच उरली आहे. यामुळे मात्र रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्यसेवेसाठी त्यांना खासगी दवाखान्यात जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.भोर शहरापासून ४० किलोमीटरवर नीरा देवघर धरणाच्या काठ रस्त्यावर (रिंगरोड) असलेल्या शिरवली हि.मा. येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. या रुग्णालयामुळे माझेरी, निवंगण, गुढे, शिरवली हि.मा., कुडली बुद्रुक, कुडली खुर्द, दुर्गाडी, अभेपुरी, मानटवस्ती या गावांतील लोकांना आरोग्यसेवा मोफत मिळणार आहे. तसेच त्यांचा भोरला येण्याचा हेलपाटा वाचणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. विविध साथींचे आजार या दिवसात पसरतात. अशा वेळी आजारी पडल्यास लोकांना खाजगी गाडीने किंवा एस.टी बसने निगुडघर किंवा भोरला यावे लागते. यामुळे या आरोग्य उपकेंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित आरोग्य उपकेंद्र सुरु करावे, अशी मागणी शिरवलीचे ग्रामस्थ व खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हनुमंत शिरवले यांनी केली आहे. (वार्ताहर)