शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

इनामगावात बेकायदेशीर वाळूउपसा सुरुच

By admin | Updated: January 11, 2015 23:46 IST

इनामगाव (ता. शिरूर) येथील घोडनदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. घोडनदी पात्रात इनामगाव वांगदरी पुलाच्या बाजूला

मांडवगण फराटा : इनामगाव (ता. शिरूर) येथील घोडनदीपात्रात बेसुमार वाळूउपसा सुरू असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. घोडनदी पात्रात इनामगाव वांगदरी पुलाच्या बाजूला दिवसाढवळ्या खुलेआम वाळूउपसा जोरात असून, ना प्रशासनाचे लक्ष ना गावकऱ्यांचे! गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी नेते फक्त महसूल खात्याच्या पदाधिकाऱ्यांना फोन करतात, परंतु काहीही उपयोग होताना दिसत नाही. गावकरीही वाळूमाफीयांच्या या दादागिरीला कंटाळलेले दिसत आहेत.घोडनदीचा वाळूचा निलाव झाला नसताना देखील या ठिकाणच्या नदीपात्रात रात्रंदिवस बेसुमार वाळुउपसा सुरु आहे. घोडनदीमध्ये शिरुरपुर्वभागात घोडधरणाच्या खालील नदीपात्रात पाणी आले आणि वाहुनही गेले . आलेले पाणी काही अंशी वाळुमाफियांनी केलेल्या खड्यात साचलेले आहे.हे खड्डे किती खोलवर केलेले आहेत यांचा अंदाज येत नाही त्यामुळे जर या खड्यात कपडे धुण्यासाठी अथवा शाळकरी मुले पोहण्यासाठी गेल्यास मोठी जीवित हानी होवु शकते.घोडनदीचे पात्र कोरडे पडलेले असल्याने या संधींचा फायदा वाळुमाफीयांनी घेतला आहे. नदीपात्रात जेसीबी ट्रॅक्टरने मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. त्याचबरोबर नदीच्या कडेला मोठमोठे खड्डे केल्याने नदीच्या बाजुच्या शेतीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होवु शकतो. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जेसीबी पोकलेन च्या सहाय्याने वाळु उपसा सुरु आहे.सध्या या भागात पावसाचे प्रमाण कमी असुन नदीपात्रात पाणी नसल्याने वाळु माफीयांना चांगलीच संधी मिळाली आहे.नदीपात्रात मोठमोठे खड्डे करुन नदीपात्राची चाळण केली आहे. (वार्ताहर)