भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:24 IST2023-11-29T15:23:48+5:302023-11-29T15:24:01+5:30
आरोपी राजगुरुनगर शहरातील भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाक्याचे एजन्सीचे काम पाहत होता

भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना
राजगुरुनगर: राजगुरुनगर शहरात भरलेल्या सिलिंडरच्या टाक्या चोरल्याप्रकरणी दोन जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संदीप धोंडिभाऊ भोकसे (रा आशानंद सोसायटी राक्षेवाडी ता खेड ), आकाश सुरेश कर्वे (रा.गुंजवठा चास ता. खेड ) अशी आरोपींची नांवे आहेत.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप धोंडिभाऊ भोकसे हा राजगुरुनगर शहरातील भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाक्याचे एजन्सीचे काम पाहत होता. त्याने ४१ हजार सहाशे रुपये किंमतीच्या गॅस भरलेल्या १३ टाक्याची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच आरोपी आकाश सुरेश कर्वे यांने शहरातील नेहरू चौक येथून दोन दिवसापुर्वी गॅस गाडीतून एच.पी. गॅस सिलेंडर टाकी चोरली तसेच वेळोवेळी इतर ठिकाणाहून १० गॅस टाक्या ३२ हजार रुपये किंमतीच्या चोरून नेल्या. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष घोलप करत आहे.