शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या शेतकऱ्यांचा स्वतंत्र ठसा

By admin | Updated: January 31, 2015 22:55 IST

कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़

खळद : कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़ नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपला स्वतंत्र ठसा उमटविला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले़ सासवड येथे पालखी मैदानावर होणाऱ्या तीन दिवसाच्या जयमल्हार कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या झाले़ या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामथे, अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, वैशाली नागवडे, माणिकराव झेंडे, दिलीप यादव, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी जगताप, सभापती गौरी कुंजीर, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथे, मनिषा काकडे, गंगाराम जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.सुळे म्हणाल्या, पुरंदरचा वाटाणा देशात प्रसिध्द् आहे़ येथील भाजीपाला संपूर्ण जगात जातो़ दुग्ध व्यवसाय वाढ झाली, युवकांनी शेतीत हरितगृहचा स्विकार करीत दर्जेदार उत्पन्न वाढविले़ तसेच अंजिर,डाळींब, सिताफळ यांचे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन शेती क्षेत्रात मोठा बदल घडविला आहे. प्रदीप कंद म्हणाले, दर्जेदार शेतीचा प्रयत्न व्हावा, कमी पाण्याचा वापर करीत आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे,यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्याच्या वापराचे ज्ञान मिळावे यासाठी अशा कुषी प्रदर्शनांचे आयोजन जिल्हा परीषदेकडून होत आहे़ तालुक्यात प्रथमच एवढे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करता आल्याचे समाधान वाटत असल्याचे निमंत्रक जि. प. च्या कृषी व पशुसवर्धन सभापती सारीका इंगळे यांनी सांगितले़ या वेळी दादा जाधवराव, आनंदी जगताप,गौरी कुंजीर यांचीही भाषणे झाली़ प्रास्ताविक अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सुत्रसंचालन पी.एस.मेमाणे यांनी केले तर आभार सुदामराव इंगळे यांनी मानले. (वार्ताहर)