देऊळगावगाडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST2021-08-18T04:13:54+5:302021-08-18T04:13:54+5:30

देऊळगावगाडा येथील श्री सदगुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यालयाचे माजी ...

Independence Day celebrations at Deulgaon Gada | देऊळगावगाडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

देऊळगावगाडा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात

देऊळगावगाडा येथील श्री सदगुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यालयाचे माजी विद्यार्थी फौजी गणेश बारवकर आणि देऊळगाव गाडा कोरोना सेंटरचे कोरोना योद्धा डॉ. अनिकेत खळदकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव बारवकर यांच्या हस्ते उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी प्राचार्य व्ही.एच. बारवकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. खोर परिसरात देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन करून अमृतमहोत्सव स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

देऊळगावगाडा (ता.दौंड ) येथील परिसरामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Web Title: Independence Day celebrations at Deulgaon Gada