पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये 29 वर्षीय महिलेसोबत अश्लील कृत्य; लॅब असिस्टंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 10:48 IST2023-05-17T10:45:31+5:302023-05-17T10:48:26+5:30

हा प्रकार या कॉलेजच्या अभियांत्रिकी विभागाच्या एचओडी कार्यालयात घडला...

Indecent act with a 29-year-old woman in a famous college in Pune; Lab assistant arrested | पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये 29 वर्षीय महिलेसोबत अश्लील कृत्य; लॅब असिस्टंटला अटक

पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये 29 वर्षीय महिलेसोबत अश्लील कृत्य; लॅब असिस्टंटला अटक

- किरण शिंदे 

पुणे : पुण्यातील नर्‍हे परिसरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात नोकरीस असलेल्या महिलेचा महाविद्यालयातील एचओडी कार्यालयात विनयभंग करण्यात आला. याच महाविद्यालयातील कम्प्युटर लॅब असिस्टंटने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात भादवी 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनेष विठ्ठल कडू (वय 35, यश प्लॅटिनम सोसायटी, पारी कंपनी चौकाजवळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार या कॉलेजच्या अभियांत्रिकी विभागाच्या एचओडी कार्यालयात घडला. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या महाविद्यालयात नोकरीला आहे. तर आरोपी देखील याच महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागात कम्प्युटर लॅब असिस्टंट म्हणून नोकरीला आहे. आरोपी मनेष याने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना एचओडी सरांच्या कार्यालयातील पंखा चालू करण्याच्या बहाण्याने आत बोलावले. त्यानंतर त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत त्यांना जवळ ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील कृत्य केले. या संपूर्ण प्रकाराने धक्का बसलेल्या फिर्यादी यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Web Title: Indecent act with a 29-year-old woman in a famous college in Pune; Lab assistant arrested