पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात, इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 23:53 IST2024-07-16T23:52:52+5:302024-07-16T23:53:00+5:30

या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Indapur taluka congress president's son dies in car accident on palkhi highway | पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात, इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात, इंदापुर तालुका काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

बारामती : बारामतीमध्ये संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर रुइ लीमटेक मार्गावर मंगळवारी (दि १६) सायंकाळी ४ च्या सुमारास कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेसच्या नेत्याच्या २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आदित्य आबासाहेब निंबाळकर(वय २२,रा.सणसर इरीगेशन बंगला,ता.इंदापुर ) असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील रुई इथं पालखी मार्गावर ही घटना घडली आहे. या अपघातात आदित्य निंबाळकर या तरुणाचा मृत्यु झाला आहे. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा आदीत्य हा मुलगा आहे.आज संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटी नजीक हा अपघात घडला. 

प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या माहितीनुसार, आदित्य हा काटेवाडी कडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या चार चाकी गाडीचं टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. त्यानंतर कार एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.दरम्यान,अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Indapur taluka congress president's son dies in car accident on palkhi highway

टॅग्स :Puneपुणे