शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वधूपित्याची वाढली धडधड

By admin | Updated: February 1, 2015 01:11 IST

महिनाभरातच सोन्याच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या लग्नात सोने खरेदी करण्यासाठी वाढीव खर्चाच्या विचाराने वधूकडील मंडळी काळजीत पडली आहेत.

अंकुश जगताप ल्ल पिंपरीमहिनाभरातच सोन्याच्या दरामध्ये मोठी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुलींच्या लग्नात सोने खरेदी करण्यासाठी वाढीव खर्चाच्या विचाराने वधूकडील मंडळी काळजीत पडली आहेत. दरवाढीमुळे सरासरी ८ टक्के जादा खर्च सोसण्याची वेळ आली आहे. वधूपित्यास तसेच वराकडील मंडळींनाही जादा खर्चाची तरतुदीसाठी धडपड करावी लागते. सोने, चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ वाढत आहे. प्रतितोळ्यासाठी घडणावळीच्या रुपाने सराफांकडून अडिच ते ३ हजार रुपयांपर्यंत खर्च आकारला जात आहे. त्यामुळे वधुसाठी किमान एक तोळ्याचा दागिना करण्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंत जादाचा खर्च करावा लागत आहे. काही सधन कुटुंबातील वधू, वरासाठी दागिने जावयी सन्मान, मध्यस्तींचा सत्कार, पाहुण्यांकडून दागिन्यांच्या रुपाने सन्मान दिला जातो. ४मागील महिन्यात २४ कॅरेट सोन्याचा दर २५ हजार रुपयांपर्यंत होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पुन्हा सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. ४२ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठीचा दर २७ हजार २५ रुपये होता. ५ तारखेला त्यामध्ये ३०० रुपयांनी वाढ होत तो २७ हजार ५०० रुपयांवर पहोचला. याचवेळी चांदीचा प्रतिकिलोचा दर ५१५ रुपयांनी वाढत ३६ हजार ७५० रुपयांवर पोहोचला. २० जानेवारीला सोन्याचा भाव २८ हजार १८० रुपयांवर पोहोचला. चांदी आणखी महाग होत ३९ हजार २०० रुपयांवर पोहोचली. २८ जानेवारीला सोन्याने २८ हजार ४४० रुपयांचा पल्ला गाठला तर चांदी ३९ हजार २१२ रुपयांवर पोहोचली. ३१ तारखेला सोने २८ हजार ५०० रुपये तोळा झाले. चांदीचा दर ३७ हजार ७२० रुपयांवर स्थिरावला.वधूपित्याचा भार हलका४परिसरात उपवर मुलींचे प्रमाण खुपच कमी आहे. अशात आपल्या लाडक्या मुलास साजेल, शोभेल अशी वधू शोधण्यासाठी त्यांच्या पालकांची धावाधाव सुरू आहे. मुलगी पसंत होते, बहुदा ती नात्यातीलच असते. मात्र तिच्या कुटूंबियांची आर्थिक स्थिती नाजूक असल्यास अशा वेळी लग्नाची बोलणी करताना हुंड्याच्या रुपाने तोळ्यांची अपेक्षा न ठेवता आम्हीच मुलीला दागीने करतो, अशी तयारी वराकडील काही मंडळी दर्शवित आहेत. त्यामुळे वधुपित्याचा दागिन्यावरील खर्चाच्या रुपाने लग्नकार्यातील भार हलका होत आहे. अनेकांचे पूर्वनियोजन आले कामी४दिवाळीनंतर सोन्याचे दर आवाक्यात आले होते. त्याचा फायदा घेत अनेक कुटुंबीयांनी आपल्या विवाहेच्छूक मुलांसाठी सोने, चांदीचे दागीने आगाऊच खरेदी करुन ठेवले आहेत. यावेळी २६ हजारांच्या आसपास दर राहिल्याने सध्याची दरवाढ पाहता त्यांची ८ टक्केंपर्यंत पैशांची बचत झाली असून पुर्वनियोजन कामी आले आहे.